मुंबई देशाची स्वप्न पूर्ण करणारी नगरी-नरेंद्र मोदी

0

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना मोदी यांनी मुंबई ही देशाची स्वप्न पूर्ण करणारी नगरी आहे असे सांगितले. मुंबईचे मन मोठे असून संपूर्ण देशाला सामावून घेण्याची ताकत मुंबईत आहे असे मोदींनी सांगितले. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारून वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

कॉंग्रेस सरकारवर टीका

मागील सरकारपेक्षा या सरकारचे संस्कार चांगले आहे. कामातील गती जास्त आहे. मागील ४ वर्षात आघाडी सरकारने २५ लाख ५० हजार घरे बांधली. या सरकारने ४ वर्षात १ कोटी २५ लाख घरे बांधली. तब्बल ५ पट अधिक घरे या सरकारने बांधली. मागील सरकारने फक्त राजकारण केले आहे अशी टीका यावेळी मोदींनी केली.

रेरा कायदा लागू करणारा महाराष्ट्र देशात पहिले राज्य असल्याचे सांगत मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.