भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबईदरम्यान विशेष पार्सल गाडी 15 मे पर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई-नागपूर विशेष पार्सल गाडी
डाऊन 00109 मुंबई-नागपूर पार्सल विशेष गाडी 3 ते 15 मे दरम्यान दरररोज मुंबई येथून 2.30 ला सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पहाटे 5.40 वाजता नागपूर स्टेशनला पोहोचेल. या गाडीला ईगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
नागपूर-मुंबई विशेष पार्सल गाडी
अप 00110 अप नागपूर-मुंबई विशेष पार्सल 3 ते 15 मे दरम्यान नागपूरते मुंबई धावणार आहे. नागपूर येथे सहा वाजता ही गाडी सुटल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबईला सकाळी 9.10 वाजता ही गाडी पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक, ईगतपुरी – रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
मुंबई-शालिमार विशेष पार्सल गाडी
डाऊन 00113 डाऊन मुंबई-शालिमार पार्सल गाडी 3 ते 15 मे दरम्यान मुंबईत येथून रात्री 11.0 वाजता प्रस्थान करून तिसर्या दिवशी शालिमारला 11.35 वाजता पोहोचेल. या गाडीला ईगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर आदी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
शालिमार-मुंबई पार्सल गाडी
अप 00114 शालिमार-मुंबई पार्सल गाडी 3 ते 17 मे दरम्यान शालिमार येथून 9.45 वाजता प्रस्थान करून तिसर्या दिवशी मुंबईला 09.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, भुसावळ, जळगाव, मनमाड व नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.