मुंबई, नागपूरसह काझीपेठ व जबलपूरसाठी विशेष गाड्या

0

गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

भुसावळ- उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना असलेली तोबा गर्दी पाहता मुंबई, नागपूरसह काझीपेठ व जबलपूरसाठी विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई-नागपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक 02021 साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस 5 मे ते 30 जून दरम्यान दर रविवारी धावणार आहे. सकाळी 11.30 वाजता मुंबईहून ही गाडी सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी 2.40 वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01074 नागपूर-मुंबई एक्स्प्रेस 6 मे ते 1 जुलैदरम्यान धावणार असून दर सोमवारी ही गाडी पहाटे साडेसहा वाजता सुटून रात्री 11.25 वाजता मुंबईला पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, ईगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगाव, पुलगांव, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

मुंबई-नागपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक 01075 साप्ताहिक मुंबई-नागपूर एक्स्प्रेस 7 मे ते 2 जुलैदरम्यान धावणार असून दर मंगळवारी ही गाडी रात्री 12.20 वाजता मुंबईहून सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी अडीच वाजता पोहोचेल तर परतीच्या प्रवासाी गाडी क्रमांक 01076 नागपूर-मुंबई विशेष गाडी 7 मे 2 जुलै दरम्यान धावणार आहे. दुपारी चार वाजता नागपूरहून सुटलेली गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी 8.20 वाजता मुंबईत पोहोचणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, ईगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, चांदुर, धामणगाव, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-काझीपेठ विशेष एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 02151 साप्ताहिक पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस 3, 10 व 17 जून रोजी रात्री 9.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6.35 वाजता काझीपेठला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 02152 काझीपेठ येथून 28 मे तसेच 4, 11 व 18 जून रोजी सायंकाळी सात वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 5.40 वाजता पुण्यात पोहोचणार आहे. या गाडीला पुणे, दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशाह, शिरपूर, काघजनगर, रामागुंदम, पेधापल्ली, काझीपेठ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-जबलपूर विशेष एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 01656 साप्ताहिक जबलपूर-पुणे एक्सप्रेस 11 ते 24 जून दरम्यान दर सोमवारी धावणार आहे. सकाळी 7.45 वाजता जबलपूरहून एक्स्प्रेस सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे 4.55 वाजता पुण्यात पोहोचणार आहे तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01655 पुण्याहून 12 मार्च ते 25 जुनदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. पहाटे 7.45 वाजता पुण्याहून ही गाडी सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे पाचला जबलपूर पोहोचणार आहे. या गाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, छनेरा, खिरकिया, हरदा, इटारसी, पिपरीया, गाडरवारा, करेली, नरसिंगपुर, श्रीधाम, मदनमहल या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.