मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारला अपघात

0

मुंबई । मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खालापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या लेनवर हा अपघात झाला. मृत व्यक्तीचे नाव ज्ञानेश्‍वर केणे असे असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक कार (एमएच 05 एएक्स 8570) भरधाव जात होती. बाकण बोगद्याच्या जवळ आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ती उलटून पुण्याला जाणार्‍या लेनवर जाऊन आदळली. यात कारमधील केणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना खालापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खालापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. किलोमीटर क्रमांक 20 जवळ झाला.