लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खालापूरजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या साखरेच्या ट्रकची समोरुन येणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चालक गंभीर जखमी आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मोहम्मद सुलतान मृत क्लिनरचे नाव आहे तर मोहम्मद मुज्जफिर असे चालकाचे नाव आहे. हे दोघंही मूळचे हरियाणातील रहिवासी आहेत.
मुंबईच्या दिशेने साखर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून वाहनाची समोरुन जाणार्या टँकरला धडक बसली. यामध्ये गाडीतील क्लिनर रस्त्यावर पडलेल्या साखरेच्या पोत्यांखाली दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला, तर चालक गाडीतच अडकला होता. बोरघाट- खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले.