मुंबई : पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर झालेल्या कार आणि ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात झाला. सकाळी सहा च्या सुमारास हा अपघात झाला.
द्रुतगती मार्गावर इनोव्हा कार चालकाला डुलकी आली आणि तो थेट पुढे जात असलेल्या ट्रक खाली घुसला. यात त्याचा जागीच मृत्यू तर शेजारी बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला. त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातामुळे काही काळ मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.