मुंबई- पुणे महामार्गावर टेम्पोच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

0

पिंपरी ः मुंबई- पुणे महामार्गावर मोहितेवाडी गावच्या हद्दीत मोटारसायकलला टेम्पोच्या जोरदार धडक बसल्याने एक शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. घरात एकुलता एक मुलगा असल्याने ब्राह्मणवाडी गावात शोकाकूल वातावरण पसरले होते. रोशन नवनाथ नवघणे (वय 15 रा.ब्राम्हणवाडी ता.मावळ ) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालक बाळकृष्ण गोविंदराव खिरे( रा.मोरेवस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन व भूषण शिवाजी नवघणे हे दोघे मोटारसायकल घेऊन मोहितेवाडी येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरून ब्राम्हणवाडी येते घरी जात होते. यावेळी मुंबई बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने रोशन गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. टेम्पो चालक याने नियमाकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणाने टेम्पो चालवत अपघात केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर करत आहे.रोशन हा वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीमध्ये शिकत होतो. तर घरात एकुलता एक मुलगा होता. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. आई व दोन बहिणी आहेत.