मुंबई-पुणे-मुंबई-३ चे टीझर प्रदर्शित

0

पुणे-मराठीतील चॉकोलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांचा मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाचा प्रवास अजूनही सुरूच आहे. सुरुवातीला मुंबई-पुणे-मुंबई, त्यानंतर मुंबई-पुणे-मुंबई २ आणि आता मुंबई-पुणे-मुंबई ३ येत आहे. मुंबई-पुणे-मुंबई ३ चे टीझर प्रदर्शित झाले आहे. खुद्द अभिनेते स्वप्निल जोशी यांनी याबाबतची माहिती ट्वीटरद्वारे दिली आहे.

मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली ही जोडी प्रेक्षकांना अधिकच भावली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे-मुंबई ३ ची चाहत्यांना उत्सुकता होती अखेर ही उत्सुकता पूर्ण झाली असून टीझरनंतर लगेचच ट्रेलर पण रिलीज होणार आहे.