मध्य रेल्वेतर्फे वाढत्या गर्दीवर नियोजन ; प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन
भुसावळ- उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना वाढत असलेली गर्दी पाहता मुंबई, पुण्यासह गोरखपूर व मंडुआडीसाठी शंभर गाड्यांच्या फेर्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाड्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी काहीशी कमी होणार आहे.
गोरखपूरसाठी विशेष साप्ताहिक गाडी
गाडी क्रमांक 02009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी धावणार असून अप-डाऊन मार्गावर या गाडीच्या तब्बल 26 फेर्या होणार आहेत. 12 एप्रिल ते 05 जुलै पर्यंत ही गाडी चालवण्यात येणार असून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5.10 वाजता ही गाडी सुटल्यानंतर दुसर्या दिवशी दुपारी 12.10 वाजता गोरखूपरला पोहोचेल. गाडी क्रमांक 02010 सुपरफास्ट साप्ताहिक विशेषी गाडी 13 एप्रिल ते 6 जुलै दरम्यान दर शनिवारी गोरखपूर येथून दुपारी 2.40 वाजता सुटून दुसर्या दिवशी 8.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावळ, बर्हाणपूर, इटारसी, भोपाळ, झांसी, उरई, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा एवं बस्ती येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 11 स्लीपर तसेच सहा जनरल डबे असणार आहेत.
एलटीटी-मंडुआडी साप्ताहिक एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई)-मंडुआडी साप्ताहिक विशेष गाडीच्या 24 फेर्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01025 साप्ताहिक विशेष लोकमान्य तिलक टर्मिनस एक्स्प्रेस 17 एप्रिल ते 3 जुलै दरम्यान दर बुधवारी 12.45 वाजता एलटीटी वरून सुटून दुसर्या दिवशी पहाटे 04.45 वाजता मंडुआडीह पोहोचेल तर गाडी क्रमांक 01026 ही 18 एप्रिल ते 4 जुलै दरम्यान दर गुरुवारी पहाटे 06.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी साडेसात वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, इलाहबाद, ज्ञानपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडील 13 वातानुकूलित डबे असणार आहेत.
पुणे-गोरखपुर साप्ताहिक एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 01475 पुणे-गोरखपूर साप्ताहिक एक्स्प्रेस 7 एप्रिल ते 30 जून दरम्यान दर रविवारी पुणे येथून सायंकाळी 7.55 वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे साडेचार वाजता गोरखपूर पोहोचेल. गाडी क्रमांक 01476 साप्ताहिक एक्स्प्रेस गोरखपू येथून दर मंगळवारी पहाटे 7.25 वाजता सुटून दुसर्या दिवशी दुपारी पाच वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी 9 एप्रिल ते 2 जुलै दरम्यान धावणार आहे. या गाडीला दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, झाँसी, उरई, कानपूर, बाराबंकी, गोंडा एवं बस्ती या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 12 स्लीपर तर पाच स्लीपर डबे जोडण्यात आले आहेत.
पुणे-मंडुआडीह साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 01497 साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस 11 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर गुरुवारी पुणे येथून रात्री 9.30 वाजता सुटून तिसर्या दिवशी 3.25 वाता मंडुआडी पोहोचेल. ही गाडी 11 एप्रिल ते 27 ून दरम्यान धावणार आहे तर गाडी क्रमां 01498 ही 13 एप्रिल ते 29 जून दरम्यान मंडुआडीह येथून दर शनिवारी सकाळी 4.45 वाजता सुटून दुसर्या दिवशी 12 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला दौंड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, इलाहाबाद एवं ज्ञानपुर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 12 स्लीपर तर पाच जनरल डबे असणार आहेत.
आजपासून आरक्षणाचा दिलासा
लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व पुणे येथून सुटणार्या विशेष गाड्यांसाठी 28 मार्चपासून पी.आर.एस केंद्र एवं रेल्वेच्या संकेत स्थळावरून तिकीट मिळणार आहे. प्रवाशांना युटीएस प्रणालीद्वारेही तिकीटाची सुविधा मिळणार असून या गाड्यांचा रेल्वे प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.