मुंबई पुन्हा बलात्काराने हादरली

0

मुंबई : खासगी टॅक्सीचालकाने प्रवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना मुंबईत घडल्याने पुन्हा एकदा अशा घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी या टॅक्सीचालकासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

चालक सुरेश पांडुरंग गोसावी (32) आणि त्याचा साथीदार उमेश जसवंत झाला (31) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 32 वर्षांची पीडित महिला मंगळवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मिरा-भाईंदरमधील काशिमिरा येथून ठाण्यास जाण्यासाठी गोसावी याच्या खासगी टॅक्सीत बसली. गोसावी आणि त्याचा साथीदार उमेश झाला यांनी आधी तिचे दागिने काढून घेतले आणि गोसावी याने तिच्यावर बलात्कार केला. या दोघांनी पीडितेला वज्रेश्वरी येथे नेले आणि तिथून पळ काढला. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. शनिवारी त्या दोघांनाही अटक करण्यात आली.