इगतपुरीत विशेष टॅ्रफिक व पॉवर ब्लॉक ; इंटरलॉकींग पॅनलसह यार्ड रिमॉडलिंगची कामे होणार
भुसावळ- ईगतपुरी येथे इंटरलॉकींग पॅनलसह यार्ड रीमॉडलिंगची कामे करण्यासाठी विशेष टॅ्रफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याने अप-डाऊन मुंबई पॅसेंजरसह गोदावरी एक्स्प्रेस 23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली होती मात्र हा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला असून आता 30 ऑक्टोबरपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
या गाड्या 30 ऑक्टोबरपर्यंत रद्द
27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान 12117 एलटीटी-मनमाड व 12118 मनमाड-एलटीटी दरम्यान धावणारी गोदावरी एक्स्प्रेस तसेच 51154 भुसावल-मुंबई सवारी (पॅसेंजर) गाडी 27 ते 30 तर 51153 मुंबई-भुसावल पॅसेंजर 27 ते 29 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, गाडी क्रमांक 11025 भुसावल-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 27 ते 30 दरम्यान व्हाया दौंड-मनमाडमार्गे धावेल तर 11026 पुणे-भुसावल एक्सप्रेस व्हाया मनमाड-दौंड धावणार आहे. या कालावधीत अनेक गाड्या उशिराने सुटणार व धाणार असल्याने रेल्वे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.