दोन गाड्यांच्या मार्गासह वेळेत बदल ; दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट ; ब्लॉकदरम्यान अनेक गाड्यांना विविध रेल्वे स्थानकांवर थांबा ; 20 ते 21 एप्रिलदरम्यान ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक ; सणासुदीत प्रवाशांची गैरसोय
भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ व ईगतपुरी स्थानकावरील पादचारी पुलाच्या निराकरण कामासाठी 20 व 21 एप्रिलरोजी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला असून या दिवशी अप-डाऊन मुंबई पॅसेंजर तसेच गोदावरी, राज्यराणी, हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दोन गाड्यांच्या मार्गासह वेळेत बदल करण्यात आला असून दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत तर ब्लॉकदरम्यान अनेक गाड्यांना विविध रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. उन्हाळी सुटी त्यातच लग्न, सणा-सुदीच्या हंगामामुळे रेल्वे गाड्यांना तोबा गर्दी असतानाच गाड्या रद्द होत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या संतापात अधिक भर पडली आहे.
मुंबई पॅसेंजरसह तीन एक्स्प्रेस गाड्या रद्द
19 रोजीदेखील 51154 भुसावळ-मुंबई फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली तसेच 20 रोजी परतीच्या प्रवासातील 51153 मुंबई-भुसावळ फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली. 20 रोजी सुटणारी अप 51154 भुसावळ-मुंबई फास्ट पॅसेंजर, 21 रोजी सुटणारी डाऊन 51153 मुंबई-भुसावळ फास्ट पॅसेंजर, 21 रोजी सुटणारी 12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस तसेच याच दिवशी सुटणारी 12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस व 22102 मनमाड-मुंबई राज्यरानी एक्सप्रेस तसेच डाऊन 22101 मुंबई-मनमाड राज्यरानी एक्सप्रेस, अप 11025 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस व डाऊन 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
विविध रेल्वे स्थानकांवर गाड्यांना थांबा
20 रोजी 11067 एलटीटी-फैजाबाद एक्स्प्रेससह गाडी 21067 एलटीटी-रायबरेली एक्सप्रेसला 7.14 ते 8.35 दरम्यान कसारा रेल्वेस्थानकावर थांबवण्यात येईल तसेच याच दिवशी सुटणारी 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस खरडी रेल्वे स्थानकावर 7.51 ते 8.30 दरम्यान थांबवण्यात येईल तसेच 20 रोजी सुटणारी 17617 मुंबई-हुजूर साहिब नांदेड तपोवन एक्सप्रेस अटगांव स्टेशनवर 7.58 ते साडेआठ दरम्यान थांबवण्यात येईल तसेच याच दिवशी 20 रोजी 15017 एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस वाशिंद रेल्वे स्थानकावर 7.53 ते 8.45 दरम्यान थांबवण्यात येईल व गाडी 15645 एलटीटी-गुवाहाटी एक्सप्रेस व 12534 मुंबई-लखनऊ पुष्पक एक्सप्रेस निर्धारीत वेळेपेक्षा 45 मिनिटे ईगतपुरी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. 21 रोजी सुटणारी 15017 एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस कसारा स्टेशनवर 8.34 ते 11.10 दरम्यान थांबवण्यात येईल तसेच याच दिवशी 12336 एलटीटी-भागलपुर एक्स्प्रेस खरडी स्टेशनवर 09.41 ते 11 दरम्यान व 12534 मुंबई-लखनऊ पुष्पक एक्सप्रेस अटगाव स्टेशनवर 10.03 ते 10.58 दरम्यान थांबवण्यात येणार आहे.
दोन गाड्यांच्या मार्गात बदल
21 रोजी सुटणारी 11063 एलटीटी-इलाहाबाद तुलसी एक्सप्रेस व 12859 मुंबई-हावडा गीतांजलि एक्सप्रेस या दिवशी दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळवण्यात येणार आहेत.
तपोवन व कामाख्याच्या वेळेत बदल
21 रोजी सुटणारी 17617 मुंबई-हुजूर साहिब नांदेड़ तपोवन एक्सप्रेस सीएसएमटीहून 6.10 ऐवजी 9.5 वाजता सुटणार आहे तर 12519 एलटीटी-कामाख्या एक्सप्रेस एलटीटीवरून 07.50 ऐवजी नऊ वाजता सोडण्यात येणार आहे.
दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट
20 रोजी सुटणारी 12140 नागपुर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस को नाशिक रोडपर्यंत चालवण्यात येईल तसेच 21 रोजी सुटणारी 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक रेल्वे स्थानकापासून सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी होणार्या असुविधेबद्दल दखल घ्यावी व रेल्वे बदलानुसार नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहने रेल्वे प्रशासनाने केले आहे