मुंबई पॅसेंजर रद्द झाल्यामुळे चाकरमान्यांची धावपळ

0

भुसावळ । सोलापूर विभागात मालगाडीला अपघात झाल्यामुळे मुंबईहून भुसावळला येणारी गाडी त्या मार्गावर चालविण्यात आल्यामुळे भुसावळ येथून 2 मे रोजी सुटणारी मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांसह चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना दुसर्या गाडीचा शोध घ्यावा लागला. तर काहींनी बसने जाण्याचा मार्ग निवडला. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मालगाडीला 1 रोजी मोठा अपघात झाला होता.

या मार्गावर भुसावळ येथे येणारी (51153) मुंबई भुसावळ या गाडीचे डबे जोडून त्या मार्गावर गाडी चालविण्यात आली. 1 रोजी मुंबईहून गाडी न आल्याने भुसावळहून मुंबईला जाणारी पॅसेंजर (51154) ही गाडी तांत्रिक कारणामुळे मंगळवार 2 रोजी अचानक रद्द करण्यात आली. या गाडीने नियमित, जळगाव, पाचोरा, चाळीसगावर्पयत प्रवास करणार्‍या चाकरमाण्यांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, भुसावळ येथून, जळगाव व पाचोरा येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी-विद्यार्थिनी आयटीआयसाठी जात असतात त्यांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. या गाडीने भुसावळ येथून चाकरमाण्या वर्गाची संख्या अधिक आहे. मात्र ऐनवेळी गाडी रद्द झाल्यामुळे नोकरदार वर्गाची अधिक धावपळ उडाली.