मुंबई बॉम्बस्फोटमधील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू

0

नाशिक:१९९२-९३मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी टायगर मेमनचा भाऊ युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

युसुफ मेमन वय ५४ हा आज सकाळी १०:३० वाजता ब्रश करत असताना अचानक खाली कोसळला. त्या मुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल पोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

त्याचा मृतदेह धुळ्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. युसुफ मेमन हा मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमन चा भाऊ होता. टायगरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून तो पाकिस्तानात पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्याचा दुसरा भाऊ इसाक मेमन हा नाशिक येथे शिक्षा भोगत आहे हे दोघेही नाशिकच्या कारागृहात २०१८पासून शिक्षा भोगत होते.