‘मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेत केनियाचा कॉसमस लॅगट विजेता

0

मुंबई : आशियातील सर्वांत मोठ्या ‘मुंबई मॅरेथॉन’ मध्ये केनियाचा कॉसमस लॅगट २०१९ चा विजेता ठरला आहे. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू विजयी ठरली आहे. मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी ठरले आहेत.

मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:४० वाजल्यापासून सुरुवात झाली. या मॅरेथॉनची मुख्य स्पर्धा ही ४२ किलोमीटरची होती. दरम्यान, २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉनमध्ये १४ हजार ४५७ धावपटूंनी सहभाग घेतला होता. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये श्रीणू मुगाता यांचा प्रथम क्रमांक आला आहे. तर करण थापा दूसरे आणि कालिदास हिरवे यांचा तिसरा क्रमांक आला आहे. हाफ मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये मंजू यादव यांचा प्रथम क्रमांक आला. तर साईगिता नाईक यांनी दूसरा तर मिनू यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.देश-विदेशातील धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. उद्योगपती अनिल अंबानींपासून भाजप काँग्रेसच्या नेतेमंडळींनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्लॅग ऑफ करुन ड्रीम रनची सुरुवात झाली.