मुंबई येथे होणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित

0

मुंबई : बारावीच्या परीक्षांमुळे मराठा क्रांती मोर्चाला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे समन्वयकांनी म्हटले आहे. 6 मार्चला हा मोर्चा आयोजित केला होता. पुढील तारिख बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल असे या मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी म्हटले. मोर्चा ज्या दिवशी होणार होता, त्याच दिवशी बारावीची गणित, सांख्यिकी आणि हिंदीचा पेपर आहे. मोर्चा या दिवशी झाला असता तर विद्यार्थ्यांना अडचण झाली असती. त्या दिवशी महाराष्ट्रातून लाखो लोक येणार होते. पालकांनी शिक्षण मंत्री यांच्या कानावर देखील हा प्रश्न घातला होता.