मुंबई:- गेल्या 3 महिन्यांपासून मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल कोरोना विषाणू मुळे थांबवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक चर्चा पसरत आहेत. परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळालेले नाहीत, त्याबाबातच्या सूचना आम्हाला मिळताच माहिती दिली जाईल. असे ट्विट सुतार यांनी केलं आहे.
लोकल सेवा सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत ही मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. पण, “उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक चर्चा पसरत आहे.