मुंबई । मुंबई विद्यापीठाचा घोळ अजुन काही थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाही.काही दिवसापुर्वी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालाची भेट घेवून निकाल वेळेेवर लावण्याची मागणी केली होती. यासह कुलगुरू देशमुख व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह कुलगुरू संजय देशमुख यांना आमदारांनी चांगले धारेवर धरले. या रोषामुळे निकाल लागल्यानंतर कुलगुरू संजय देशमुख याची गच्छंती होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यत लावण्यासाठी कुलगुरूनी सर्वापतरी प्रयत्न करित असुन यात पेपर तपासण्यासाठी प्राध्यपकाची चांगलीच कसोटी सुरू आहे. यातच विद्यापीठ अधिकारी धमकवित असल्याचा आरोप झाल्यामुळे विद्यापीठाच्या निकालावरुन नविन वादाला तोड फुटले आहे. दरम्यान, पेपर तपसाणीत विलंब होत असल्याने,यावेळी आर्टस् आणि काही अभ्यासक्रमांचे 31 जुलैपर्यंत निकाल लावणे शक्य नसल्याचे खुद्ध विद्यापीठाच्या अधिकार्यांनीच मान्य केले. तर चुकीचे निकाल लावण्यापेक्षा दोन दिवस उशीरा निकाल लागलेला बरा, असा बचावात्मक पवित्रा विनोद तावडेंनी घेतला.
स्पष्टीकरण द्यावे हातेकरांची मागणी
मुंबई विद्यापीठाने एक सर्क्युलर काढले असुन ते प्राध्यापकांना प्रेरणा देणारे आहे.मात्र विनायक दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 तास काम न करणार्या प्राध्यापकांवर विद्यापीठ कायदेशीर कारवाई करणार आहे. मात्र निकाल वेळेवर लागावा म्हणून बरेच प्राध्यापक खुप मेहनत घेत असुन निकाल वेळेवर लागण्यासाठी रविवारी येवून सुध्दा काम करित आहे.त्यामुळेच विद्यापीठाचा निकालचे काम आटोक्यात आले आहे. अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे.अशी प्रतिक्रिया नीरज हातेकर यांनी दिली आहे.माध्यमांतुन अशी वक्तव्ये करणार असतील त्यांनी त्याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी हातेकर यांनी केली आहे.