मुंबई विद्यापीठाला ‘नॅक’ दर्जा मिळवून देणार – रविंद्र वायकर

0

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा ‘नॅक’ दर्जा कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास विलंब करणार्‍या विद्यापीठातील संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानपरिषदेत तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना दिले.

विधानपरिषदेचे आमदार रामहरी रुपनवर यांनी मुंबई विद्यापीठाला शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय नामांकन यादीत स्थान मिळाले नाही. त्याचबरोबर ‘नॅक’चे पुर्न मुल्यांकन एप्रिल २०१७ पर्यंत मिळविले नाही. पर्यायाने आज रोजी विद्यापीठा नॅकचा दर्जा नसल्याने झालेल्या दिरंगाईबद्दल विधानपरिषदेत तारांकीत प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाला २०१२ मध्ये (नॅक) मुल्यांकन प्रक्रिया पुर्ण केली. त्यावेळी विद्यापीठाला ‘अ’ मिळाला होता. या दर्जाची मुदत संपली असतानाही मुंबई विद्यापीठाने दर्जा प्राप्त करण्यासाठी पुनश्‍च वेळेत अर्ज का केला नाही? यात काही अडचणी येत असतील तर विद्यापीठाशी चर्चा करुन मार्ग करण्यात येईल का? असे प्रश्‍न उपस्थित केले.

‘नॅक’चा दर्जा कायम राखण्यासाठी विद्यापीठातील ज्या अधिकार्‍यांकडून हलगर्जीपणा झाला आहे, त्याची चौकशी करुन निश्‍चित कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर गरज भासल्यास विद्यापीठातील अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन वायकर यांनी यावेळी दिले. आमदार निरंजन डावखरे तसेच आमदार हेमंत टकले यांनी सहभाग घेतला.