मुंबई विमानतळावरील इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

0

मुंबई : इंडिगो सुरक्षेला विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी देणारा फोन आला असून मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान बॉम्बने उडवू अशी धमकी इंडिगो कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेला आली. या संदर्भातील बातमी वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोच्या मुंबई-दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली. ज्यानंतर हे विमान रिकामे करण्यात आले आणि त्याची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही मिळाले नाही. यासंबंधी माहिती देणाऱ्या महिलेची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे असेही समजते आहे. तिने असा दावा केला आहे की, विमानात बॉम्ब ठेवणाऱ्या काही लोकांना ती ओळखते. ही महिला मूळची सिंगापूरची असून पुढील चौकशी सुरु आहे असे समजते.