मुंबई । मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या दोन कारवाईत 40 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकूण चार आरोपींना कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. मस्कतहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबईला आलेल्या विमानातून तीन आरोपींनी प्रत्येकी 10 तोळे सोन्याची 4 बिस्किटे आणली होती. तर दुसर्या घटनेत कुवैतहून मुंबईमध्ये आलेल्या विमानात 1 किलोचे सोन्याचे दोन तुकडे जप्त करण्यात आले.