मुंबई शहरात क्रिकेटनंतर हॉकी लीगच्या सामन्याला गर्दी

0

मुंबई । मुंबई या शहरात क्रिकेटचे वेड खुप पहायला मिळते मात्र सध्या या शहरात क्रिकेट वेडा बरोबर हॉकीचे वेड ही बघायला मिळाले आहे. याचबरोबर या मोसमात तरूण खेळाडूंचा दबदबा राहिला आहे.त्यातही भारतीय खेळाडूनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आयपीएलच्या धतीवर 2013 हॉकी इंडिया लिंगचा पाचवा मोसम पार पडला. या मोसमात हॉकी पंजाब,हरियाणा, ओरिसा,तर उत्तर प्रदेश एवढीच मर्यादित राहिली. याचबरोबर मुंबईत या खेळासाठी गर्दी होत आहे.ते खुप मोठे आहे.

हरमनप्रीतने एक चांगला पर्याय उपलब्ध केलाय
भारतीय हॉकीच्या दृष्टीने यंदाचा मोसम लक्षात राहील तो काही तरुण भारतीय खेळाडूंनी दाखविलेल्या चमकदार कामगिरीमुळे. दबंग मुंबईचा हरमनप्रीतसिंग यातलाच एक खेळाडू. गेल्या काही वर्षात भारतीय हॉकीसाठी पेनल्टी कॉर्नवर हक्काने गोल करणारे रुपिंदरपालसिंह आणि व्ही.आर.रघुनाथ यांना युवा हरमनप्रीतने एक चांगला पर्याय उपलब्ध केलाय. पेनल्टी कॉर्नर हा हॉकीत गोल करण्याचे एक हक्काचे अस्त्र मानले जाते. परंतु भारतीय संघात रुपिंदर हा हा पेनल्टी कॉर्नरवरचा एकखांबी तंबू बनला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यात रघुनाथ सतत अपयशी होत असताना हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

हरमनप्रीत सातव्या क्रमांकावर
सर्वाधिक गोल करणार्‍यांच्या यादीत आपल्या संघातील सीनियर खेळाडूंना मागे टाकत हरमनप्रीतने सातवा क्रमांक पटकावला तर रुपिंदर 10 आणि रघुनाथ 26व्या क्रमांकावर फेकले गेले. ड्रॅगफ्लिक करताना हॉकीस्टिकची पोजिशन, वेळप्रसंगी डमी शॉट तयार करुन समोरच्या बचावपटूला चकवणे, श्रीजेश, अँड्रू चार्टर यांच्यासारख्या तगड्या गोलकीपरचा बचाव भेदणे या गोष्टी हरमनप्रीतला सहज जमायला लागल्यात. युवा विश्वचषकातला भारताच्या विजयातही हरमनप्रीतने मोलाचा वाटा उचलला होता.