मुंबई सिटीचा रूटरशी झाला करार

0

मुंबई । इंडियन सुपर लीगमधील बॉलीवुडा अभिनेता रणबीर कपूरच्या मालकीचा असलेल्या मुंबई सिटी एफसीने रूटर या जगातल्या पहिल्या रिअल-टाइम स्पोर्ट्स सोशल मंचाशी करार केला. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी रूटर हा मुंबई सिटी एफसीचा अधिकृत भागीदार असणार आहे.

नवीन चाहत्यांना जोडणार
दिएगो फोर्लानसारखे उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक अलेक्झांडर गुईमाराइस आणि बॉलिवूडचा यंगहार्ट तसेच फुटबॉलची जाण व आवड असणारा रणबीर कपूर अशी तगडी मंडळी असणारा मुंबई सिटी एफसी हा संघ सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. अशा संघाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यासाठी रूटर प्रयत्नशील असणार आहे. एमसीएफसीच्या चाहत्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुंतवून ठेवतानाच महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी नवीन चाहत्यांना जोडून घेण्याचे कामही रूटर करणार आहे. रूटरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष म्हणाले की, मुंबई सीटीचे अधिकृत मनोरंजन भागीदार बनणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. चाहत्यांच्या मनोरंजनासाठी रूटरचे एक्स्पर्ट सहाय्य एमसीएफसीला मिळणार आहे. ज्यामुळे तिकीट विक्री, मर्चंडाइज, प्रयोजकत्वाच्या माध्यमातून महसूल मिळवला जाईल.