भुसावळ : रेल्वेने विशेष शुल्कावर सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून रेल्वे प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया द्वि-साप्ताहिक विशेष गाडी
02811 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 3 ऑक्टोबर 2021 ते 2 जानेवारी 2022 व 02812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि -साप्ताहिक विशेष गाडी 1 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत धावणार आहे.
पुणे-सांत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी
02818 पुणे-सांत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी 4 ऑक्टोबर 2021 ते 27 डिसेंबर 2021 पर्यंत चालवण्यात येणार आहे तसेच 02817 सांत्रागाची- पुणे साप्ताहिक विशेष गाडी 2 ऑक्टोबर 2021 ते 25 डिसेंबर 2021 पर्यंत चालवण्यात येणार आहे.
साईनगर शिर्डी-हावडा साप्ताहिक विशेष गाडी
02593 साईनगर शिर्डी-हावडा साप्ताहिक विशेष गाडी 9 ऑक्टोबर 2021 ते 1 जानेवारी 2022 पर्यंत चालवण्यात येणार आहे.
02594 हावडा-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी 7 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2021 पर्यंत चालवण्यात येणार आहे. दरम्यान, केवळ आरक्षीत तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच व कोरोना नियमांचे पालन करणार्या प्रवाशांना सुपरफास्ट स्पेशल ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार आहे.