मुंबई-इगतपुरी स्थानकाजवळ मुंबईवरून हावडाला जाणाऱ्या मुंबई-हावडा मेलचे तीन डबे रेल्वे रुळावरून घसरले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घसरलेले डबे बाजूला काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. पण या अपघातामुळे या मार्गावारील लांबपल्ल्याच्या १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
12 trains on the route cancelled, 1 short terminated after three coaches of Mumbai-Howrah Mail(via Nagpur) derailed near Igatpuri railway station in Maharashtra
— ANI (@ANI) June 10, 2018
या अपघातामुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द, तर काही गाड्या वेगवेळ्या रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या. तसेच मुंबई-पटना एलटीटी-पाटली पुत्र एक्स्प्रेस व मुंबई-बनारस महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणे मार्गे सोडण्यात आल्या आहेत. मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी करण्यात प्रशासनाला यश आले आहे, त्यावरून धीम्या गतीने काही गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र डाऊन लाईन अजूनही बंद असल्याने दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्याचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.