धुळे : तालुक्यातील मुकटी गावातील संशयीताकडून गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस धुळे गुन्हे शाखेने जप्त करीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आकाश उर्फ दीपक बन्सीलाल पवार (23, लोढा नगर, मुकटी, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एलसीबीच्या पथकाला मुकटी गावातील संशयीत दीपक पवार याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवार, 29 रोजी सायंकाळी संशयीताच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराची झडती घेतली असता 33 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व चार हजार रुपये किंमतीचे चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. संशयीताने हा कट्टा दोन संशयीतांकडून विकत घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल योगेश जगताप यांच्या फिर्यादीवरुन आकाश उर्फ दीपक बन्सीलाल पवार (23) व त्याच्या दोन साथीदारांविरुध्द धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी उशिरा दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, एएसआय धनंजय मोरे, हवालदार प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.