मुकबधीरांचा विवाहातून एकमेकांना आधार

0

जळगाव। जन्मत:च मुकबधीर असलेले युवक-युवती विवाह बंधनातुन एकमेकांचा आधार होणार असुन या विवाहासाठी समाजातील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. पाल येथील आदीवासी उन्नती मंडळाचे अध्यक्ष रमजान सरदार तडवी आणि जिल्हा काँग्रेसच्या मानव विकास सेलचे सरचिटणीस फिरोज हमजान तडवी यांच्या मध्यस्थीने मुकबधीर युवक-युवतीच्या आयुष्यात सुखपर्व निर्माण होणार आहे. रावेर तालुक्यातील लोहारा येथील रसिदखाँ हमजानखाँ तडवी यांची कन्या अंजुम बानो आणि रावेर तालुक्यातीलच सावदा येथील वजीरखाँ हसनखाँ तडवी यांचा मुलगा फिरोजखॉ हे दोघी मुकबधीर आहेत.

आदीवासी उन्नती मंडळाचा पुढाकार
समाजातील मान्यवरांच्या पुढाकाराने या दोन्ही मुकबधीर युवक-युवतीच्या विवाहाचा योग जुळून आला आहे. 6 एप्रिल रोजी लोहारा येथे या दोन्ही मुकबधीर युवक-युवतीचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नक्षराध्यक्ष शितल पाटील, रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल पाटील, शैलेश राणे, राजु सुवर्णे आदी मान्यवर वरवधुंना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. तरी परीसरातील सर्व मान्यवर नागरीकांनीही या मुकबधीर युवक-युवतीच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन फिरोज तडवी यांनी केले आहे.