शेंदुर्णी : गेले सव्वा महिन्यापासुन 1000 व 500 नोटाबंदीने सर्वसामान्याच्या राष्ट्रीयकृत बँकासमोर मोठमोठ्या रांगा लागल्या त्याचा सर्वाधिक ताण बँक कर्मचार्यांना सहन करावा लागला व हक्काच्या सुट्टयावर पाणी सोडुन त्यांना परीवाराला वेळ देणेही अशक्य होउन बसले होते तर आंनदाचे क्षण दुरापास्त झाले होते, परंतु डिसेंबर महिण्यात दि. 10,11,12 अश्या सलग तीन दिवस बँकाना सुट्या मिळाल्याने सदर सुटीचा बँक कर्मचार्यांनी हिल स्टेशन, देवदर्शन दौरा किंवा घरीच राहुन थकवा घालवला. अशातच येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे शाखाधिकारी आशिष मेंढे व पुजा मेंढे यांचा मुलगा व विजया मेंढे यांचा नातु अर्णव याचा चौथा वाढदिवस याच सुट्टया दरम्यान आल्याने मेंढे परीवाराने अर्णवचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने येथुन जवळच असलेल्या पिंपळगाव (हरेश्वर) येथील कर्ण बधीर निवासी विद्यालयातील मुक बधीर विदयार्थ्यासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला.
विदयालयातील 40 विद्यार्थी भारावले
नियोजन केल्यानंतर विदयालयातील 40 विदयार्थीसाठी मिष्ठान्न गरम भोजन बनवुन सर्वांना भरपेठ आग्रहाने आशिष, पुजा, अर्णव व विजया या मेंढे परीवारातील सदस्यांनी घास भरविले तेव्हा मुकबधीर विद्यार्थी मित्रांच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहत असताना मेंढे परीवारातील सदस्याच्या चेहर्यावर समाधानाची छटा स्पष्टपणे जाणवत होती. संपुर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवुन एक वेगळा आदर्श घातला या क्षणाचा आनंद त्यांचे मित्र परीवारातील सपोनि एच.एल.गायकवाड, अशोक जैन, आशिष संघवी,पी.डी.पाटील, डॉ.नितीन पाटील,डॉ.प्रशांत देशमुख, प्रतिभा वाघ, प्रविण सुर्यवंशी, चंद्रकांत कासट तसेच कर्णबधीर विदयालयाचे कार्याध्यक्ष टी.बी. पाटील, सचिव आर.डी.देशमुख, मुख्याध्यापक इश्वर पाटील, गोविंद महाजन, नंदा पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग व विदयार्थ्यांनी घेतला.