मुक्कामी असणारी बस जाळल्याने खळबळ

0

अमळनेर प्रतिनिधी । गावात मुक्कामाला असणारी एसटी बस जाळल्याचा प्रकार तालुक्यातील मांडळ या गावी घडल्याने खळबळ उडाली आहे.

अमळनेरहुन नेहमीप्रमाणे मांडळ गावाला मुक्कामाला येणारी बस ही आगारातून आठ वाजुन पंधरा मिनिटांनी सुटली व ती मांडळ गावाला नऊ वाजता एस टी क्रमांक एमएच १४ बिटी ०४१९ पोहचली प्रवासी उतरल्यावर बसचालक वाहक जेवण करून ग्रामपंचायतीच्या हॉल मध्ये झोपले. रात्री अचानक बस पेटताना गावकर्‍यांना दिसली. यामुळे गावकर्‍यांनी धाव घेत बसला लागलेली आग विझवली. तथापि, यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुशील हिरालाल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमविरोधात भादवी कलम ४३५, ४२७, ३३६, २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.