मुक्तळला कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

0

बोदवड । तालुक्यातील मुक्तळ येथील तरुण शेतकरी शिवदास वसत भागवत (35) यांनी 3 रोजी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज डोईजड झाल्याने व यंदा हंगामात उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

शेतात केले विष प्राशन
मुक्तळ येथील शिवदास भागवत हे शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून शेतात गेले होते तर 11.30 वाजता ते घरी परतले मात्र घरात येताच ते चक्कर येऊन पडले तसेच त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने कुटुंबियांनी त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांनामयत घोषित केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे. मोठे बंधू सतीश भागवत रांच्रा खबरीवरुन बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास बी.झेड.जाने करीत आहे. बोदवड ग्रामीण रुग्णालयात डॉ.अमोल पवार यांनी शवविच्छेदन केले.