शेंदुर्णी : मुक्ताईच्या मार्गदर्शनामुळे जगाल ज्ञानेश्वरी मिळाली असे प्रतिपादन प्रा. प्रकाश एदलाबादकर यांनी केले. ते कै.आचार्य गजाननराव गरुड व्याख्यान मालेत व्दितीय पुष्प गुंफतांना बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संजय गरुड तर सागरमल जैन, आशिष मेंढे, शांताराम गुजर, मुख्याध्यापक मांडवळे , ए.टी.चौधरी , प्र.प्राचार्य भोळे , अनिल झवर , माजी मुख्याध्यापक एस.बी.पाटील व्यासपिठावर उपस्थीत होते.
आधुनिककाळातील मुक्ताई बहिणाबाई चौधरी
प्रा. एदलाबादकर यांनी पुढे सांगितले की, संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ , सोपानदेव यांच्या लहान भगिनी असतांना एकाचवेळी आई, गुरू, मार्गदशकाची भुमिका त्यांनी पार पाडली. तसेच मुक्ताईने ताटीचे अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांची समजूत काढून कर्मठांच्या छळाकडे दुर्लक्ष करण्याचे मार्गदर्शन केले. जगात सर्व श्रेष्ठ ठरलेली ज्ञानेश्वरी लिहीण्यामागे संत मुक्ताईचा समजुतदारपणा व मार्गदर्शकाची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. सर्व भावंडांमध्ये वयाने लहान असतांना देखील संत मुक्ताईने गुरूची भुमिका पार पाडली आहे. तशीच भूमिका आधुनिक काळात खान्देशकन्या दुसरी मुक्ताई बहिणाबाई यांनी पार पडल्याचे प्रा. एदलाबादकर यांनी स्पष्ट केले. संत मुक्ताईची महती त्यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांनी श्रोत्यांना समजविली. यावेळी मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती.