मुक्ताईनगरचा लाचखोर पुरवठा अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

0

मुक्ताईनगर- स्वस्त धान्य दुकानदाराने दर महिन्याला पाचशे रुपये लाच देण्याची मागणी मुक्ताईनगरातील पुरवठा अव्वल कारकुनाच्या अंगलट आली असून लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने आरोपीच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयातच सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. गणेश रतन राजपुत (31, रा.शिव कॉलनी, मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लाच भोवली : तहसीलमधूनच केली अटक
मुक्ताईनगर तालुक्यातील 34 वर्षीय तक्रारदाराचे स्वस्त धान्य दुकान असून दर महिन्याला हप्त्यापोटी पाचशे रुपयांची मागणी आरोपी गणेश राजपूत यांनी 26 रोजी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता आरोपीने तहसील कार्यालयात लाच घेताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.