मुक्ताईनगरच्या भाजपा नगरसेवकांना दिलासा ; अपात्रतेला तात्पुरती स्थगिती

0

मुक्ताईनगर- मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपाच्या नगरसेविका शबानाबी अ.आरीफ यांना तीन अपत्य प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी 30 रोजी अपात्र ठरवले होते. या निर्णयानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे गटातील नगरसेवकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती तर अपात्रतेच्या या आदेशाविरुद्ध नगरसेविका शबानाबी अ.आरीफ यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपिल केले होते. नगरसेविकास मंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशास पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे राज्य शासनाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी 7 फेब्रुवारीच्या पत्रान्वये कळवल्याने नगरसेविका शबानाबी यांना दिलासा मिळाला आहे.