जळगाव। साधारण 20 हजाराच्या वर लोकसंख्या असणार्या गावात नगर पालिकेची स्थापन करण्यात येते. मुक्ताईनगर हा तालुक्याचा शहर असुन जवळपास 20 हजाराची लोकसंख्या पार करण्याच्या मार्गावर असल्याने मुक्ताईनगर ग्रामपंचायतची नगरपरिषदेत रुपांतर होणार आहे यासंबंधी अधिगृह अधिसुचना येत्या आठवड्याभरात निघण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात जिल्ह्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतची निवडणुक होऊ घातली आहे यात मुक्ताईनगर ग्रामपंचायतचा देखील समावेश आहे. त्यामुळे निवडणुकच्या पार्श्वभूमिवर प्रभाग रचना देखील पार पडली आहे. मुक्ताईनगरातील प्रभाग रचनाकरतांना मोठा गाजावाजा झाला. शिवसेना व भाजपातर्फे प्रभाग रचना करतांना गोंधळ करण्यात आला होता. मात्र ही ग्रामपंचायत येत्या काळात राहणार नसून त्याचे रुपांतर नगरपरिषदेत होणार आहे. मुक्ताईनगरात नगरपरिषद व्हावे अशी नागरिकांची इच्छा आहे.