मुक्ताईनगरला नगरपंचायतीचा दर्जा ; प्रशासकांनी स्वीकारला पदभार

0

प्रोसेडींग बुक ताब्यात ; दप्तर पूर्णत्वासाठी कर्मचार्‍यांनी ‘जागली रात्र’

भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरला सोमवारी रात्री नगरपंचायत जाहीर झाल्याचा आदेश येथे धडकताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले तर मंगळवारी मुक्ताईनगरच्या तहसीलदार रचना पवार-पाटील यांनी प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीकडे दप्तर द्यावयाचे असल्याने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कर्मचार्‍यांनी अज्ञात स्थळी रात्र जागून काढल्याची माहिती आहे.

पंचायत समिती सभासदत्व रद्द
मुक्ताईनगर शहर हद्दीत पंचायत समितीचा गण येत असल्याने या गणाच्या पंचायत समिती सदस्य भारती भोई यांचे सभासदत्वदेखील रद्द करण्यात आले आहे. नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांच्या स्वाक्षरीने अधिसूचना निघाली आहे.

लोकनेते नाथाभाऊंचा सत्कार
मुक्ताईनगरला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या लोकनेते नाथाभाऊंचा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी सत्कार केला. प्रसंगी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी-खडसे खेवलकर, कृउबा सभापती निवृत्ती पाटील, विलास धायडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.