मुक्ताईनगरला पोलिस कर्मचारी-अधिकारी निवासस्थान बांधकामासाठी 15 कोटींचा प्रस्ताव

0

मुक्ताईनगर- पोलिस अधिकारी व कर्मचारी निवासस्थान व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासाठी 15 कोटी 20 लाखाचे बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. मुक्ताईनगर उपविभागातील बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय निवासस्थान नसल्याने अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचार्‍यांना भाडे तत्वावरील निवासस्थानांचा सहारा घ्यावा लागत असून कौटुंबिक व अन्य अडचणी येत असल्याने निवासस्थाने बांधण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंचाही पाठपुरावा
पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचया निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे हे देखील बर्‍याच वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. येथे अधिकारी व कर्मचारी यांची 75 पदे आहेत. केवळ 30 पोलीस कर्मचारी यांना निवासस्थान असून एकही अधिकारी यांना शासकीय निवासस्थान नाही. आधी पोलिस उपनिरीक्षकांचे निवासस्थान असलेल्या ठिकाणी आज रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय कार्यान्वीत आहे. अधिकार्‍यांस उर्वरीत कर्मचार्‍यांसाठी आता ज्याठिकाणी पोलिस निवासस्थाने आहेत याच 717 गटामधील एक हेक्टर 98 आर जागेवर 11 कोटी 20 लाख खर्चाचे पोलिसस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्यासाठी नव्याने निवासस्थानाचा प्रस्ताव तसेच उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या स्वतंत्र कार्यालयासाठीचा कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला आहे.