मुक्ताईनगरला ‘मुक्त’ केल्याबद्दल जनतेचे आभार; उद्धव ठाकरेंचा खडसेंना टोला !

0

जळगाव: मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील पहिलाच मेळावा होत आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनाही अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. मुक्ताईनगरमधील भाजप उमेदवाराला पराभूत करून जनतेने मुक्ताईनगरला मुक्त केले असे सांगून मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना त्यांच्याच अंगणात डिवचले आहे. मुक्ताईनगर म्हणजे एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या विधानसभा निवडणुकीत त्यांची कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचा शिवसेनेचे अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला.