मुक्ताईनगर। येथील उज्जैनकर फाऊंडेशनतर्फे विविध मुक्त विद्यापीठांतर्गत दहावी, बारावी नापासांना पदवीधर होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, राजस्थान मुक्त विद्यापीठ याअंतर्गत बी.ए., बी.कॉम., एम.ए. तसेच एम.कॉम. प्रवेश व मार्गदर्शन केंद्रास प्रारंभ झाला. या केंद्राचे उद्घाटन दिपक सोनी व दिपाली सोनी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष एस.एम. उज्जैनकर यांनी या कोर्सेसविषयी मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
तसेच याअंतर्गत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना घरबसल्या आपले शिक्षण पूर्ण करता येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमोद पिवटे, सुधाकर पाटील, जयश्री भोंबे, जयवंत बोदडे, नितीन भोंबे, शामकांत रुले, अरविंद उज्जैनकर, सतिष वराडे, विजय पाटील, तुषार भोळे, अंकित नायसे, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.