मुक्ताईनगर : शहरातील अॅग्रीकल्चर महाविद्यालयातील नवीन इमारतीतून इलेक्ट्रिक साहित्यासह 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर शहरातील अॅग्रीकल्चर महाविद्यालयात नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगची देखील कामे सुरू आहेत. 31 ऑक्टोबर 2021 च्या पूर्वी याठिकाणी काम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी नवीन उषा कंपनीचे 108 कंपनीचे सिलिंग फॅन, 148 ट्यूबलाईट, 50 लहान लाईट असा एकूण 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बंद खोलीचे कुलूप तोडून लांबवला. या संदर्भात गव्ह. इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट्रर प्रवीण शरद बडगुजर (49, रा.साक्री, जि.धुळे) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.