मुक्ताईनगर- शहरातील जुने गावातील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय इसमाचा खामखेडा पूर्णानदीच्या पुलाखाली मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. किरण रामदास धामोळे (33, जुने गाव, मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, या इसमाने आत्महत्या केली? की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात संजय रामदास धामोळे (47, जुने गाव, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सादीक पटवे करीत आहेत.