मुक्ताईनगरातील जलवाहिन्यांना गळती

0

मुक्ताईनगर । ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागली आहे. यामुळे परिसरात पाण्याचे डबके साचत असून यावर डासांचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीच्या गलथन कारभारामुळे नागरीकांचे आरोग्य संकटात सापडले आहे.मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करणार्‍या वाहिन्याची रेणुकानगर बसस्टॅड परीसर अष्टविनायक कॉलनीसह शहरातील इतरही भागात गळतीमुळे रहीवाशांचे आरोग्य धोक्यात आले असुन नागरीकांना डायरीया, उलट्या सारख्या आजारांना समोरे जावे लागत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
सरपंच ललित महाजन यांच्या कार्यकाळात कर्मचारी असो की सफाई कर्मचारी यांच्या सरपंचासह ग्रामविकास अधिकार्‍यांची वचक राहीलेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या जलवाहीण्या तर जागोजागी लिकेज आहेत. शिवाय प्रत्येक वार्डातील नागरी समस्याही कायमच आहे. गटारी कचर्‍यामुळे भरुन तुडुंब वाहत असुन शहरात डासांचा प्रादुर्भाव खुपच वाढलेला आहे. त्यामुळे एकमेव ग्रामसभांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचे माध्यम असतांना आतापर्यंतच्या ग्रामसभा जनते अभावी आटोपल्याच्या तक्रारी वाढतच आहेत. त्यामुळे मनमानी कारभार करणार्‍या ललित महाजन यांच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने शहरीतील महाजन यांच्या गटाची भाजपा पंचायत समिती उमेदवाराला पराभव स्विकारावा लागला आहे तरी सुद्धा पक्ष या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याची खंत जनतेतुन व्यक्त होत आहे. तरी मोठे जनआंदोलन उभे राहण्याच्या अगोदर वरीष्ठांनी लक्ष देणेे गरजेचे आहे. नागरीकांना भेडसावणार्‍या समस्यांवर तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे.