मुक्ताईनगर : शहरातील 25 वर्षीय तरुणाने विषारी द्रव सेव करून आत्महत्या केली. ही घटना रविवार, 10 रोजी घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अमोल संचालाल चव्हाण (25, कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वामी समर्थ मंदिराजवळ, मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. अमोल चव्हाण यांनी मोनोसिल नावाचे विषारी द्रव प्राशन केल्यानंतर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असल्याने त्यांचा रविवारी मृत्यू ओढवला. पोलिस उपनिरीक्षक परवीन तडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देवून माहिती घेतली. तपास हवालदार मोहम्मद तडवी करीत आहेत.