मुक्ताईनगर- गुरुनाथ फाउंडेशनतर्फे रविवारी आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात एक हजार 300 युवकांना नोकरी मिळाली. खासदार रक्षा खडसे यांच्या संकल्पनेतून आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष नजमा तडवी, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन ,जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, वैशाली तायडे, वनिता गावडे पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजू सावळे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष विलास तायडे ,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर ,प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे ,रमेश ढोले ,कल्पेश बेलदार ,तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर ,योगेश कोलते ,संदीप देशमुख, संतोष बबलू कोळी, भुसावळ सभापती प्रीती पाटील, रावेरच्या सभापती माधुरी नेमाडे, युवा मोर्चाचे दत्ता पाटील ,अंकुश चौधरी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सात हजार युवकांची नोंदणी ; 1300 युवकांना रोजगार
मेळाव्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील 63 कंपन्यांनी हजेरी लावली. याप्रसंगी मुलाखती घेऊन बेरोजगार युवकांना तत्काळ कॉल लेटर देण्यात आले. यात एक हजार 300 बेरोजगार युवकांचा समावेश होता. जवळपास सात हजार विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी नोंदणी याठिकाणी केल्याने संत मुक्ताई परीसरात युवकांची मोठी गर्दी जमलेली होती. कंपन्यांनी युवकांचे आवेदन पत्र स्वीकारलेले असून त्यानंतरही त्यांना पात्रताधारक उमेदवारांना बोलावण्यात येणार असल्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीव साळवे तर आभार प्रा.विशाल डांगे यांनी मानले.