मुक्ताईनगरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध : प्रतिमेला मारले जोडे

0

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणार्‍या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करून प्रवर्तन चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून बॅनर जाळण्यात आली. पडळकरांनी तातडीने शरद पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा जिथे भेटेल तिथे त्यांचे तोंड काळे करण्यात येईल व राष्ट्रवादी युवकचे कार्येकर्ते चोप दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील व उप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांच्या वतीने देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी युवक तालुकाध्यक्ष शाहीद खान, ऋषिकेश पाटील, रोहित सोनवणे, अविनाश जैन, लखन पाटील, नरेंद्र पाटील, सोनू पाटील, श्रीकांत पाटील, प्रमोद संदले, विकी ठाकरे, उमेश भोलाणे, प्रशांत पाटील, सागर भोई तसेच युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.