मुक्ताईनगरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध

0

मुक्ताईनगर : चाळीसगाव मतदारसंघाचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पातळी सोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेची शिवसैनिकांनी निषध केला आहे. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल गैर वक्तव्य करणार्‍या आमदार चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व होणार्‍या परीणामास प्रशासन जबाबदार असेल, इसा इशारा निवेदनाद्वारे शिवसैनिकांनी तहसीलदार शाम वाडकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, अ‍ॅड.मनोहर खैरनार, शहर प्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, महेंद्र मोंढाळे, पिंटू पाटील, राजेंद्र तळेले, शेख हारून, शेख गयास, कलिम मणियार, मनोज मराठे, पप्पू मराठे, हरी माळी, निलेश घुले यांची उपस्थिती होती.