मुक्ताईनगरात एमआयडीसी निर्मिती व्यापारी संकुलाची होणार निर्मिती : केळी उत्पादकांना देणार दिलासा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
Chief Minister’s Big Announcement : MIDC Will Be Held in Muktainagar ; Banana Producers Will Make Way in The Vabinet Meeting Today ! मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल शिवाय शहरात एमआयडीसीची निर्मिती करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आयोजित सभेत दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी मुक्ताईनगरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी केळी उत्पादकांना भेडसावत असणार्या सीएमव्ही रोगाबाबत बुधवारी कॅबिनेट बैठकीत ठोस निर्णय घेण्याची ग्वाही देवून केळी उत्पादकांना आश्वस्त केले.
आमदारांनी मांडल्या विविध समस्या
आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविकात मुक्ताईनगर मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावावा, केळीवरील सीएमव्ही रोगाची भरपाई मिळावी, मुक्ताईनगर येथील व्यापारी संकुलाचा प्रश्न सोडवावा, तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, मेंढपाळांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या आमदारांनी केल्या. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिले तसेच केळीवरील सीएमव्हीबाबत बुधवारच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्याची ग्वाही देत शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही, असेही सांगितले.
‘एक’ नाथ मागे लागले मात्र दुसरे ‘नाथ’ मात्र सोबत
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सहा टर्म आमदार असणार्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी घरी बसवले असून हा एक विक्रमच आहे. माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री अशी टीका केली जाते मात्र मी शेतकर्यांना न्याय देण्यासाठी कंत्राट घेतला आहे शिवाय सर्वसामान्य जनता व शेतकर्यांसाठी मी कंट्रोल हातात घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील कर्की-पुरनाड सबस्टेशन, नाबार्ड योजनेंतर्गत सुखी नदीवरील पुर्नंबांध तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील जुन्या गावातील नाटेश्वर मंदिराजवळील सभागृह कामाचे रीमोट दाबून मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केले.
आमदार खडसेंनी घेतली अमित शहांची भेट
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या 30 वर्षापासून मुक्ताईनगर शहराचा विकास रखडला आहे. या तालुक्यातील थंड बस्त्यात असलेल्या प्रकल्पांना मान्यता द्यावी, अशी मागणी आमदारांनी करीत आता त्यांनी मधमाशांचे दुकान लावल्याचा टोला त्यांनी खडसेंचे नाव न घेता लगावला शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेटदेखील घेतली, असा दावाही खडसेंचे नाव न घेता आमदार पाटील यांनी केला.
मी पणा करणार्यांचा अहमपणा संपला
मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर टिका करीत मी म्हणणार्यांचा अहमपणा संपल्याचे सांगून आपल्याला मोका लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, खोट्या केसेस करून त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मीदेखील आमदार आहे मात्र तुमच्या मतदारसंघाची अवस्था पहा काय झाली आहे, असा टोला मंत्री खडसे यांना लगावला.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री बच्चू कडू, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, शहाजी बापू, उदय सामंत, संजय गायकवाड, खासदार उन्मेश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लता सोनवणे, आमदार राजूमामा भोळे आदींची उपस्थिती होती.