भुसावळ – मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील महाजन ऑटो पार्टस् हे दुकान चोरट्यांनी फोडून 19 हजारांच्या रोकडसह 41 हजार 560 रुपयांचा सामान लांबवला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांविरूध्द मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार पटवे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.