मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील प्रकार, महिनाभरात चौथी अप्रिय घटना
मुक्ताईनगर- तालुक्यातील मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील पूर्णा नदीच्या काठावर अनोळखी महिलेच्या अंगावर 11 चाकूने वार करून तिची हत्या करीत मृतदेह नदीपात्रात फेकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभरात तब्बल तीन खुनाचे प्रकार झाले असताना .व त्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नसताना पुन्हा चौथा खून झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खामखेडा रस्त्यावरील पूर्णा नदीच्या काठावर एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. ही महिला सुमारे 30 ते 35 वर्षे वयोगटातील असून तिच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट असा पोशाख होता. तसेच तिच्या शरीरावर 11 वार झाले होते. त्यामुळे अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
महिनाभराच्या अंतरात तीने जणांचे खून
तालुक्यात 13 ऑक्टोबर रोजी पिंप्राळा शिवारातील कुर्हा ते धुपेश्वर रस्त्यावर प्लास्टिक कागदात गुंडाळलेला महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता तर 3 नोव्हेंबरला पुरनाड फाट्यावर अनोळखी पुरूष, यानंतर 29 ऑक्टोबरला मुक्ताईनगर-मलकापूर हायवेवरील गॅस गोडावून मागील झुडूपात पुरूषाचा कुजलेला मृतदेह आढळला. आता पुन्हा अनोळखी महिलेची हत्या समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासन गुन्हेगारांचा शोध घेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.