भुसावळ-महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरू पाहत असलेल्या मुक्ताईनगरात गुरुवार, 14 फेब्रुवारी रोजी सत्ता संपादन मेळावा होत असून भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे खासदार अससुद्दीन ओवेसी मार्गदर्शन करणार असल्याचे भारिपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी कळवले आहे. मुक्ताईनगरातील एस.एम.महाविद्यालयाच्या पटांगणात 14 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता हा मेळावा होणार आहे.
यांची राहणार उपस्थिती
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, माजी आमदार हरीभाऊ भदे, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी आमदार लक्ष्मण माने, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, माजी मंत्री दशरथ भांडे, कुशाल मेश्राम उपस्थित राहतील. सत्ता संपादन मेळाव्याच्या माध्यमातून विविध जाती, जमाती, सामाजिक घटकांची मोट बांधण्यात येत आहे. असे जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी सांगितले. मेळाव्याच्या तयारीसाठी भुसावळात आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, कार्यालयीन सचिव संजय सुरडकर, विश्वनाथ मोरे उपस्थित होते.