मुक्ताईनगर : शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील गोरगरीब नागरीकांना 20 क्विंटल धान्याचे वाटप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रवर्तन चौकात करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, नूतन मराठा कॉलेज व्हा.चेअरमन विरेंद्रजी भोईटे, अॅड.मनोहर खैरनार, जिल्हा अल्पसंख्यांक संघटक शिवसेना अफसर खान, जाफर अली, माजी उपजिल्हाप्रमुख सतीश नागरे, उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, युवा सेना माजी तालुका प्रमुख सचिन पाटील, उपतालुकाप्रमुख राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, स्वीय सहायक प्रवीण चौधरी उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, दीपक खुडे, पंकज राणे, निखील राणे, प्रकाश गोसावी, अनिकेत भोई, पवन भोई, अमोल भोई, सचिन भोई, सुरेश भोई, आकाश भोई, चेतन भोई, योगेश भोई व शिवसैनिकांनी परीश्रम घेतले.